भरून आलेलं आभाळ,
सांजवेळेचा आभास....
कधी कोसळती धारा,
कधी नुसताच गार वारा.....
तरी मातीला येई गंध,
अन हवेत,....सुखद ओलावा...
भरून आलेलं मन,
भूतकाळाचा प्रवास.....
कधी अश्रू ओघळणारे,
कधी नुसतेच ओथंबलेले.....
तरी दाटून येई कंठ,
अन हवेत,.......एकाकी स्तब्धता....
सांजवेळेचा आभास....
कधी कोसळती धारा,
कधी नुसताच गार वारा.....
तरी मातीला येई गंध,
अन हवेत,....सुखद ओलावा...
भरून आलेलं मन,
भूतकाळाचा प्रवास.....
कधी अश्रू ओघळणारे,
कधी नुसतेच ओथंबलेले.....
तरी दाटून येई कंठ,
अन हवेत,.......एकाकी स्तब्धता....