एकांत !
हवाहवासा अन सुखावणारा ,
मनाला खूप काही शिकवणारा
स्वतःची नवी ओळख करून देणारा .....
एकटेपणा !
एक एकांतच दुखावणारा ,
नेहमीच्या वाटेवरही चुकावणारा ,
गर्दीतही स्वतःत हरवून नेणारा ....
तुझा सहवास !
सोबतीतही एकांत देणारा ,
न बोलताच खूप काही समजून घेणारा ,
एक विलक्षण अनुभव भुरळ घालणारा !....
तुजपासून दुरावा !
जणू एकांतवास जीव घेणारा ,
तुझ्या एका हाकेसाठी आसुसणारा ,
प्रतिक्षेच्या पावसात अखंड भिजवणारा !...