Thursday, June 25, 2015

म्हातारपण

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं,
तुमचं आणि आमचं बरचसं सेम असतं!!

लक्ष वेधून घेण्यासाठी,
तेव्हाही युक्ती लढवली जाते!
अन कुठली साधीशी गोष्टही,
टचकन डोळ्यात पाणी आणते!!

मोठ्यांच्या विश्वात स्वतःचं,
छोटं जग निर्माण होतं!
अन पुढे छोट्यांचं विश्वच,
आपलं मानावं लागतं!!

खूप काही बोलायचं,
बरंच काही सांगायचं असतं!
अन कुणीतरी हट्ट पुरवावेत,
ह्याची वात बघणं असतं!!

तेव्हा असते घाई,
मोठ्ठ मोठ्ठ होण्याची!
अन आता राहते आस,
हसत-खेळत पूर्णविरामाची!!