Wednesday, January 13, 2016

आठवणी



हल्ली अशीच येतेस तू …. 
अवचित,
एखाद्या पाहुण्यासारखी …
अन उधळून लावतेस काही क्षणात,
मी नुकत्याच आवरलेल्या मनाला …


ह्या आधी बरसायचीस  तू ..... 
हळुवार,
श्रावणातल्या सरींसारखी ..... 
अन प्राजक्ताचा सडा ओवून सजवायचीस,
माझ्या नुकत्याच गहिवरलेल्या मनाला..... 


तू येत रहा, नव्हे 
असतेसच तू ,
एका अध्रुष्य सावलीसारखी… 
पण आता तुझी पानं उलगडतांना,
बांध घाल ह्या ओथंबलेल्या मनाला.....