Wednesday, December 15, 2021

अव्यक्त भावना

 तू असलास की वाटतं,

खूप काही सांगायचंय,

मनात साठलेल्या वादळाला...

आता मनसोक्त बरसायचंय!! 


अडखळेन, थरथरेन,

ओली चिंब होईन, व्यक्त होतांना!!

तुही भिजशील, थोडासा...

मला मिठीत घेऊन समजावतांना... 


हळू हळू ओसरेल सारं ,

लख्ख प्रकाशही पडेल!!

तेव्हातरी माझ्यावरचं प्रेम...

तुझ्या ओठांवर असेल??