Thursday, March 28, 2019

मनातल्या मनाच 

पहिल्या श्वासापासून  ....
आपण तसे  एकटेच असतो ,
माझे  माझे म्हणत ...
नुसत्या भ्रमात जगत असतो !

वेळेच  भान ठेवत ,
काळाच भान विसरतो ...
अन  सुखाच्या मागे धावत
निर्मळ हसू हरवतो !

सगळ्यांचा विचार करत ,
स्वतः ला मात्र गृहीत धरतो ...
अन तत्वांना गोंजारत बसत ,
मनाला बंधनात अडकवतो !

आदर्शवादाचा घोषा करत ,
फक्त कर्तव्यच बजावत राहतो ...
अन प्रेमात आकंठ बुडुनाही ,
मग कोरडेच बाहेर पडतो !

अहो , कधीतरी , आपल्या मनालाही ,
त्याच्या मनासारख वागू द्याव ...
अन विसरुन जाऊन स्वतःलाही
त्याच्या सच्या  प्रेमाला बिलगू  द्याव !!


तो अणि ती

तिच्या मनातलं सारंच
त्याला असतं माहीत
तरीही
ती सांगत असते,
ती बोलत असते
अन मागत असते.. 
कधी प्रेमाने
कधी अधिकाराने
तर कधी आर्त स्वरांत

त्याचा चेहरा, ढिम्म
पापणी देखील लवत नाही
"कळतंय मला" असं म्हणतो... 
पण तसं तिला कधीच दिसत नाही

त्याच्या मनातलं, तो... 
कधीच बोलत नाही!! 
अन ती जे असते ओळखून,
ते तीच टाकते बोलून
तो फक्त मान हलवतो.. 
कधी प्रेमाने
कधी नाइलाजासतव.. 
तर कधी पूर्णविराम म्हणून

Mars चा तो
Venus ची ती
Earth वर
एकत्र येऊन 
असांच संवाद साधत
संसार करतात!! 
अन जन्मोजन्मी चा license 
तरीही renew करतात..दरवर्षी!!

.......सोनिया