Sunday, September 19, 2010

दिवाळी

दीपावलीच्या आगमनाने सर्वत्र
पसरतील रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा
पण मिटवू शकतील का त्या
दहशतवादाच्या अंधाराला?

विविध पदार्थांच्या सुवासाने
पाणी सुटेल तोंडाला
पण भागवू शकेल का हा फराळ
भ्रष्टाचाराच्या भुकेला?

फटाक्यांची दारु उडवून
मिळेलही आनंद काही जणांना
पण थोपवू शकेल का ही आतषबाजी
काश्मीर मधल्या असंख्य आसवांना?

चला तर मग सगळे मिळून
करू एकच प्रार्थना ईश्वराला
मिळूदे सुख, समाधान
शान्ति ह्या जगाला!!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.