हल्ली अशीच येतेस तू ….
अवचित,
एखाद्या पाहुण्यासारखी …
अन उधळून लावतेस काही क्षणात,
मी नुकत्याच आवरलेल्या मनाला …
ह्या आधी बरसायचीस तू .....
हळुवार,
श्रावणातल्या सरींसारखी .....
अन प्राजक्ताचा सडा ओवून सजवायचीस,
माझ्या नुकत्याच गहिवरलेल्या मनाला.....
तू येत रहा, नव्हे
असतेसच तू ,
एका अध्रुष्य सावलीसारखी…
पण आता तुझी पानं उलगडतांना,
बांध घाल ह्या ओथंबलेल्या मनाला.....
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.