Wednesday, May 23, 2018

एकांत अन एकटेपणा

एकांत !
हवाहवासा  अन  सुखावणारा ,
मनाला  खूप  काही  शिकवणारा 
स्वतःची  नवी  ओळख  करून  देणारा .....
 
एकटेपणा !
एक  एकांतच  दुखावणारा ,
नेहमीच्या  वाटेवरही  चुकावणारा ,
गर्दीतही  स्वतःत  हरवून  नेणारा ....
 
तुझा  सहवास !
सोबतीतही एकांत  देणारा ,
न  बोलताच  खूप काही समजून घेणारा ,
एक  विलक्षण  अनुभव  भुरळ  घालणारा !....
 
तुजपासून  दुरावा !
जणू एकांतवास जीव घेणारा ,
तुझ्या  एका  हाकेसाठी आसुसणारा ,
प्रतिक्षेच्या पावसात अखंड  भिजवणारा !...

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.