पहिल्या श्वासापासून ....
आपण तसे एकटेच असतो ,
माझे माझे म्हणत ...
नुसत्या भ्रमात जगत असतो !
वेळेच भान ठेवत ,
काळाच भान विसरतो ...
अन सुखाच्या मागे धावत
निर्मळ हसू हरवतो !
सगळ्यांचा विचार करत ,
स्वतः ला मात्र गृहीत धरतो ...
अन तत्वांना गोंजारत बसत ,
मनाला बंधनात अडकवतो !
आदर्शवादाचा घोषा करत ,
फक्त कर्तव्यच बजावत राहतो ...
अन प्रेमात आकंठ बुडुनाही ,
मग कोरडेच बाहेर पडतो !
अहो , कधीतरी , आपल्या मनालाही ,
त्याच्या मनासारख वागू द्याव ...
अन विसरुन जाऊन स्वतःलाही
त्याच्या सच्या प्रेमाला बिलगू द्याव !!
आपण तसे एकटेच असतो ,
माझे माझे म्हणत ...
नुसत्या भ्रमात जगत असतो !
वेळेच भान ठेवत ,
काळाच भान विसरतो ...
अन सुखाच्या मागे धावत
निर्मळ हसू हरवतो !
सगळ्यांचा विचार करत ,
स्वतः ला मात्र गृहीत धरतो ...
अन तत्वांना गोंजारत बसत ,
मनाला बंधनात अडकवतो !
आदर्शवादाचा घोषा करत ,
फक्त कर्तव्यच बजावत राहतो ...
अन प्रेमात आकंठ बुडुनाही ,
मग कोरडेच बाहेर पडतो !
अहो , कधीतरी , आपल्या मनालाही ,
त्याच्या मनासारख वागू द्याव ...
अन विसरुन जाऊन स्वतःलाही
त्याच्या सच्या प्रेमाला बिलगू द्याव !!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.