मन माझ मागे धावतय,
प्रवासातल्या आठवणीत रमतय,
चहाच्या बागेत हुंदडतय,
तुझ्या सहवासात शहारतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!
प्रवासातल्या आठवणीत रमतय,
चहाच्या बागेत हुंदडतय,
तुझ्या सहवासात शहारतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!
नारळाच्या झाडांना,
समुद्री किनारांना,
हिरव्यागार डोंगरांना,प्राण्या साठवून ठेवतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!हो , मन माझ मागे धावतय!!
जंगलातल्या प्राण्यांना,
तळ्यातल्या पक्ष्यांना,
मसाल्यातल्या पदार्थांना,
नाव अन गंधासहित आठवतंय
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!
त्या स्पर्शाला, त्या श्वासांना,
मन पुन्हा पुन्हा अनुभवतय,
निशब्द लयीतील त्या गाण्याचे बोल,
आजही ओठांवर गुणगुणतय,
जणू परत तिथे जायचं म्हणतंय!
हो , मन माझ मागे धावतय!!
नसेल पुढे ह्यातलं काही,
राहतील फक्त आठवणी,
पण उजळतील दिशा दाही,
उलगडतील मनीची पाने नवी..
लिहितील पुन्हा एक काव्यकहाणी!
आठवणींना बरोबरघेऊन अन,
आपल्या हातात नवी सोबत ठेऊन!
मन त्याच क्षणाची वाट पाहतंय........!!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.