Thursday, June 7, 2012

तू.....

माझ्या मनात तू,
माझ्या श्वासात तू,
आयुष्यातील सुख-दुखांच्या..
क्षणा-क्षणात तू!!

पहाटेच्या किरणात तू,

रात्रीच्या गारव्यात तू,
हसण्यात तू, रुसण्यात तू,
रोज नव्या रुपात तू,
ओथंबलेल्या नयनातील..
थेंबा-थेंबात तू!!

पावसाच्या पाण्यात तू,

रण-रणत्या उन्हात तू,
पानात तू, फुलात तू,
मातीच्या गंधात तू,
अथांग ह्या निसर्गातील...
कणा-कणात तू!!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.