Tuesday, September 25, 2012

विरह कविता


तू नसलास की,
आठवतात तुझे शब्द...
जाणवतात तुझे श्वास...
तुझ्यासोबत घालवलेल्या असंख्य क्षणांची,
मग ध्यानीमनी ओवली जाते माळ...
अन विरहातही तूच अलगदपणे,
उमलवतोस हसू माझ्या ओठांवर!

तू नसलास की,

भासते तुझी चाहुल...
लागते तुझी ओढ....
तुझ्यासोबतच्या  गप्पांची अन भांडणांची,
मग रचली जाते एक सुंदर कविता...
अन विरहातही तूच हळुवारपणे,
रेखाटतोस तिला माझ्या हृदयावर!

तू आलास की,

दिसते तेच हसू अन..
ऐकू येते तीच कविता...
तुझ्यासोबत आलेली मला भेटायला..
विराहातल्या आपल्या क्षणांचे,
ते एकच असते कॅनवास....
जे एकमेकांच्या सहवासातही,
घर करून राहते आपल्या अंतरंगावर...!!!!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.