Thursday, March 27, 2014

गंध

मिळतील आपल्याला ही आकर्षक रंग,
ह्या आशेवर समजावले एकमेकांना...
पण निसर्गाकडील रंगच संपले,
सजवण्यात आमच्या इतर सख्यांना!

आमच्या अशेच्या किरणांना...
झाकले निराशेच्या ढगांनी!
मनातल्या निशब्द भावनांना...
व्यक्त केले ओलावल्या डोळ्यांनी!

अन, असवांना फुंकर घालीत,
वारयाची एक मंद झुळूक आली.....
मदतीचा हात पुढे करात
एक छोटेसे गुपीत, सांगून गेली..

असेल रूप बाकीच्यांकडे पण,
तुमच्याताही आहे बरच काही.....
माझ्या सवे तुमच्या गंधाने,
मुग्ध करू दिशा दाही..

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.