IT field मध्ये काम करणाऱ्यांबद्दल नेहमीच उलट सुलट चर्चा सुरू असते. खरं तर IT आणि private नोकरी ह्यात फारसा काही फरक नसतो तरी त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. म्हणून त्याबद्दलचे माझे विचार ह्या कवितेतून मांडायचा प्रयत्न केला आहे.
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..,तुमचं आपलं...बरंय!!
तुम्ही काय software वाले,
आहात "work from home"च्या चैनीत,
आम्ही आपले जातोय कामावर,
त्या कोरोना ला भीतभीत!!
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..., तुमचं आपलं...बरंय!!
मोठ्या मोठ्या इमारतीत,
आधुनिक अन् उत्तम सोयी!
वेळे ची तुम्हास flexibility,
नाही कशाचीच घाई!
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..., तुमचं आपलं...बरंय!!
हो..हो..तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं.....बरंय!!
Flexi timings मध्ये,
संपतच नाहिये काम,
"Work from home" म्हणत...
वाढतोय घरातलाही ताण!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं...बरंय!!
जरा परिस्थिती बिघडली,
की लागते पगारावर कात्री!
कितीही productivity वाढवा...
नसते नोकरी टिकण्याची खात्री!!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं....बरंय!!
नवीन नवीन technology,
शिक्षणाला नसे अंत!
शनिवारी सुद्धा तशी,
क्वचितच मिळते उसंत!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं....बरंय!!
सण-वार तर विचारूच नका,
सगळ्यालाच लागतात रजा...
सरकार दरबारी हक्काच्या सुट्ट्या,
एकदा हिशोब लावून बघा!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं...बरंय!!
बाहेरुन दिसत असतं,
सगळ शांत, चकचकीत!
पण खोल दरीतील खळबळ
असते पोहणाऱ्यालाच माहीत!!
कष्टाला पर्याय नाही,
हेच फक्त खरंय!
काम आहे म्हणूनच,
तुमचं आमचं बरंय!!!!
काम आहे म्हणूनच,
तुमचं आमचं बरंय!!!!
......... सोनिया
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..,तुमचं आपलं...बरंय!!
तुम्ही काय software वाले,
आहात "work from home"च्या चैनीत,
आम्ही आपले जातोय कामावर,
त्या कोरोना ला भीतभीत!!
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..., तुमचं आपलं...बरंय!!
मोठ्या मोठ्या इमारतीत,
आधुनिक अन् उत्तम सोयी!
वेळे ची तुम्हास flexibility,
नाही कशाचीच घाई!
सगळे म्हणतात ते खरंय,
IT वाल्यांनो..., तुमचं आपलं...बरंय!!
हो..हो..तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं.....बरंय!!
Flexi timings मध्ये,
संपतच नाहिये काम,
"Work from home" म्हणत...
वाढतोय घरातलाही ताण!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं...बरंय!!
जरा परिस्थिती बिघडली,
की लागते पगारावर कात्री!
कितीही productivity वाढवा...
नसते नोकरी टिकण्याची खात्री!!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं....बरंय!!
नवीन नवीन technology,
शिक्षणाला नसे अंत!
शनिवारी सुद्धा तशी,
क्वचितच मिळते उसंत!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं....बरंय!!
सण-वार तर विचारूच नका,
सगळ्यालाच लागतात रजा...
सरकार दरबारी हक्काच्या सुट्ट्या,
एकदा हिशोब लावून बघा!
तरी, तुम्ही म्हणता ते खरंय,
आमचं आपलं...बरंय!!
बाहेरुन दिसत असतं,
सगळ शांत, चकचकीत!
पण खोल दरीतील खळबळ
असते पोहणाऱ्यालाच माहीत!!
कष्टाला पर्याय नाही,
हेच फक्त खरंय!
काम आहे म्हणूनच,
तुमचं आमचं बरंय!!!!
काम आहे म्हणूनच,
तुमचं आमचं बरंय!!!!
......... सोनिया
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.