तुझ्यावर काहीतरी लिहावं
असं वाटत होतं कितीतरी दिवसांपासून
पण लिहायला बसलं की
आठवणींच्या पुरात मीच जायचे वाहून!
अश्रु पुसायला फक्त
एकाच गोष्टीची गरज असते
आणि त्या मायेच्या पदराची उणीव
सतत आम्हाला भासत असते!
तुझ्या स्वयंपाकाची सर
कधीच कशाला आली नाही
साधा तो दहीभात सुद्धा, का गं
आता आम्हाला मिळणार नाही!!
आजीपेक्षा सुद्धा तू
माझी जवळची मैत्रीण होतीस,
फक्त मी कितीही चिडले-रुसले
तरी तू मात्र रुसत नव्हतीस!
पण आता मात्र तुझ्या रागावण्याची
अगदीच हद्द झाली
खरं सांग, तुला नाही का गं
आमची कधी आठवण आली?
अशा प्रश्नांची उत्तरे मिलणं
फार फार अवघड आहे
पण तरीसुद्धा एक गोष्ट
मला पक्की माहीत आहे,
जरी समोर नसलीस तरी
सतत तू आमच्या पाठीशी आहेस!
शरीराने बरोबर नसलीस तरी
मनाने कायम आमच्यातच आहेस!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Dear Soniya
ReplyDeleteFarach chhan kavita!
Me tujhya sagalya kavita vachalya.Khoop mast!
Ani blog chalu kelyabaddal abhinandan.
.....
Keep writing ..will keep reading:)
Charu