सांग न ग आई.......
आई, हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
तूच तर मला शिक्षणाचे बाळकडू पाजलेस,
तूच नाही का संस्कारांनी मला मोठे केलेस,
बाबांनीच तर बोट धरून चालायला शिकवले,
भांडूनही भावाशी ज्या मनमोकळं बोलले...
त्या तुम्हा सर्वांना सोडून, मी लांब जायलाच पाहिजे का?
सांग न, हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
तुम्ही मला प्रेमानी जे नाव दिले,
ज्या नावानी माझी वेगळी ओळख दिलीत!
यश-अपयशाचे ऋतू मी ज्या घरात पाहिले,
माझ्या आसवांना ज्यानी त्याच्या मनात लपविले!
त्या नावाला व घराला, मी बदलायलाच पाहिजे का?
सांग न ,हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
वीस वर्ष तुमच्या प्रेमात मी ओथंबून न्हाहले,
अन दोन महिन्यांपुर्वीच तर मी "त्याला" पाहिले!!
त्याच्या राज्यात असतील मला सगळेच अअसंनोळखी,
एका क्षणातच तरीही माझी बदलतील नाती...
ह्या नवख्या माणसाला, मी सर्वस्व द्यायलाच पाहिजे का?
सांग न ग आई, हे असं सगळं व्हायलाच पाहिजे का?
Farach chhan!
ReplyDeleteTu maayboli war lihit ka nahis?
Vichar karayala lawanari kavita!
Charu