मनात असतो विचारांचा काहूर,
तरी शब्द येत नाहीत ओठांवर!
खूप काही सांगायचं असतं....
पण उमटत नाही काहीच कागदावर!!
किती वेळा वाटतं की आता..
सोडून द्यावेत हे पाश मायेचे!
पण नाही सुटत ते रेशमी बंध..
आपल्याच नात्यातील कर्तव्याचे!!
रक्ताची नाती तर
“ready made” मिळतात,
अन बाकीची म्हणे,
“customized” असतात!
तरी, “its my choice” हा,
असतो निव्वळ भास,
सगळं आधीच असतं...
"त्यानी" ठरवलेलं खास!!
त्यातूनच मग जुळतात का,
काहींचे सूर अनोखे?
अन त्यालाच म्हणायचे का,
आपण मैत्रीचे नाते??
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.